कवठे येमाई दि .१२ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट महाविद्यालयाच्या प्रांगणात सन १९७८-७९ मध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एकत्र येऊन स्नेह मेळावा व गुरुजन सन्मान सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले.या मेळाव्यासाठी सन १९७८-७९ च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे शिक्षक कवितके सी. के. वाळुंज एस.जे, आवळकर एस. के. कांदळकर अे. डी. यांचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
त्यावेळची शाळेतील मस्ती, गमतीजमती, अभ्यास, शिक्षकांचा मिळालेला मार, शिक्षा, शाळेतील क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज नोकरी, राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत तर काही निवृत्त झाले असून त्यांनी आपल्या क्षेत्रात कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झाले आहोत हे विसरून गेले होते. त्यावेळी असणारे विद्यार्थी आता आपआपल्या क्षेत्रातून निवृत्त झाले आहेत. हे दिवस कसे सरले हे कळलेच नाही असे अनेकांनी मनोगत व्यक्त केले. त्या वेळच्या आठवणी आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाहीत असेच सर्वांना वाटत होती व पुन्हा एकदा एकत्र आल्यानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. बाबाजी तथा महादेव गावडे उपस्थित होते. त्यांचाही सन्मान या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. या स्नेह मिळवण्यासाठी ३२ विद्यार्थी सपत्नीक उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्या वेळच्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करुन आपल्या मनोगतामध्ये त्यांनी या बॅचचा खूप अभिमान असल्याचे मत व्यक्त करून आपल्या शिष्यांचे कर्तुत्व पाहून जीवन सार्थक झाले असे म्हटले .प्रमुख पाहुणे बाबाजी गावडे यांनी शालेय जीवनातील त्या वेळच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. ग्रामस्थांच्या वतीने रामदास सांडभोर यांनी मनोगत व्यक्त केले.
स्नेह मेळाव्याचे नियोजन प्रकाश ईचके, दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक लक्ष्मण कुंभार, ज्ञानसुख फटांगडे, गंगाधर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत कांदळकर, प्रास्ताविक व स्वागत प्रकाश इचके, आभार सेवानिवृत्त प्राचार्य संजय चौधरी यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थी लक्ष्मण कुंभार, ज्ञानसुख फटांगडे, अनिल रोडे, अर्जुन वागदरे, प्रकाशे ईचके, बाबाजी फटांगडे, सुनील रत्नपारखी, विमल थिटे, गंगाराम गायकवाड, रोहिदास वागदरे, जयवंत भोर, निवृत्ती कोळेकर, बबन वागदरे ,कुशाबा ईचके, शांताराम इचके, मंदा चोरे, मीरा शिंदे, रत्नप्रभा पवार, मधुकर केदारी, राजेंद्र कोठारी, सुभाष रेणके, सिताराम येडे,जयश्री अडुळकर, मिट्ठु बाफना आदी उपस्थित होते. यावेळी विद्यालयासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला.

– सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Users Today : 39