देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख समाजसेवा मंडळाच्या वतीने गुणवंतांचा कौतुक सोहळा

Khozmaster
3 Min Read
अकोला: मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती यशाकडे घेउन जाणारी असते, त्यामूळे प्रत्येक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून यश केवळ साधनांनी नव्हे तर प्रामाणिक प्रयत्न व इच्छाशक्तीच्या जोरावर हमखास मिळवता येते.असे प्रतिपादन निर्माण ग्रुपचे संस्थापक- अध्यक्ष गणेशराव देशमुख यांनी केले.ते देशमुख समजातील गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळयात बोलत होते.
माध्यमिक,उच्च माध्यमिक परीक्षेसह विविध शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करता यावा या उद्देशाने देशमुख समाज जागृती मंडळ व  देशमुख समाज सेवा मंडळाच्या संयुक्तं विद्यमाने गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा पत्रकार कॉलनीतील मिलन सभागृहात निर्माण ग्रुपचे गणेशराव देशमुख यांचे अध्यक्षतेत संपन्न झाला.यावेळी आमदार नितिनबाप्पू देशमुख,आर.आर.सी समूहाचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख, काँग्रेसचे अविनाश  देशमुख ज्येष्ठ मार्दर्शक के.व्ही.देशमुख,विठाई बाल रुग्णालयाचे डॉ.मदन महल्ले, कविताताई ढोरे,पुष्पाताई देशमुख  हे व्यासपीठावर उपस्थित होते.
       या कार्यक्रमाला अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर,देशमुख देशमुख जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख,कंझारेकर यांच्यासह  देशमुख महिला मंडळाचे अध्यक्षा राजश्री  देशमुख मंडळ सदस्य वसंतराव देशमुख,धारेरावबाप्पू देशमुख, सोनुबाप्पू देशमुख ,उगवा, पत्रकार दिलीप दांदळे, कृष्णराव देशमुख, संजय देशमुख,रविन्द्र बाप्पू देशमुख, नायगांवकर व ईतर अनेक  मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख,सावित्रीबाई फुले प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी न्यूयॉर्क येथे शिक्षणासाठी असणाऱ्या सुजल दत्तात्रय देशमुख,नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कीर्ती देशमुख,सृष्टी देशमुख, क्षितिजा देशमुख, ऋतुजा देशमुख यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक, युवतींचा सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे यावेळीही गुणवंत म्हणून मुलींचा टक्का मुलांपेक्षा अधिक होता.प्रास्ताविक देशमुख समाज जागृती मंडळाचे  उपाध्यक्ष प्रा.संजय देशमुख यांनी केले यावेळी देशमुख कुटुंबातील विद्यार्थी व पालकांची मोठया  संख्येने उपस्थिती होती. अग्निवीर पुरुषोत्तम धनंजय देशमुख यांना विशेष मेडल मिळाल्याबद्दल आमदार  देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
      शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था बिकट झाली असून आजच्या युवकांनी  केवळ नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळले पाहिजे. तसेच उपवर मुलींनी केवळ नोकरी करणाऱ्या मुलांएवजी व्यवसायातून अर्थिक प्रगती करणाऱ्या मुलांची निवड केली पाहिजे असे प्रतिपादन आमदार नितिनबाप्पू  देशमुख यानी केले.
      प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा आदर्श ठेवून आयुष्यात कार्य केले पाहिजे,आपल्या आईवडीलांचा संघर्ष हेच आयुष्याची खरी प्रेरणा आहे.वैद्यकीय क्षेत्रातही ॲलोपॅथीसह आयुर्वेद, होमीओपॅथी,निसर्गोपचार, फिजीओथेरीपीसह विवीध संधी उपलब्ध असल्याची भावना विठाई बाल रुग्णालयाचे डॉ.मदन महल्ले यांनी केले.
     आपले ध्येय निश्चित करून त्याबाबत प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते,त्यामुळे आपली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी मेहनत करणे व आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रयत्नशील असणे हाच यशाचा खरा मार्ग ठरेल असे प्रतिपादन आर.आर.सी समूहाचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन देशमुख हरिष देशमुख अंकुश देशमुख राजाभाऊ देशमुख सुजय देशमुख यशवंत देशमुख अश्विन राजाभाऊ बाबाराव   देशमुख,अनिल देशमुख व सर्व सदस्य देशमुख समाज जागृती मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी अश्विनबापू देशमुख ,योगेश बापू देशमुख, संदीपबाप्पू देशमुख, विजयबाप्पू देशमुख, जागृती व अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाचे सर्व सदस्य,प्रतिष्ठीत मंडळी,समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *