‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये नाशिक अग्रेसर; प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पास सीईओंची भेट

Khozmaster
2 Min Read

नाशिक : प्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात मोठी समस्या आहे. प्लास्टिक संदर्भात प्रक्रिया व्यवस्थापन करून प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे व प्लास्टिकची मूल्यवाढ करणे इत्यादी गोष्टींसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यूनिट स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी ९ यूनिट कार्यान्वित झाले असून, नाशिक ग्रामपंचायतच्या पिंप्री सय्यद येथील युनिटला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली.

यावेळी मित्तल यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यूनिटच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन पाहणी केली. हे यूनिट उत्तम प्रकारे कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणाचे अभिनंदन केले. पुढील काळात प्लास्टिक संकलन करून या युनिटच्या माध्यमातून प्लास्टिक व्यवस्थापनाचे काम करावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.या केंद्रामुळे प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सोपे होणार असून, शास्त्रीय पद्धतीने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. तरीदेखील नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन ग्रामपंचायत स्तरावर करावे. प्लास्टिकमुळे गावातील पर्यावरण धोक्यात येणार नाही याबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दीपक पाटील, गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे, श्रीधर सानप, स्वच्छता तज्ज्ञ संदीप जाधव, ग्रामविकास अधिकारी डी. पी. गांगुर्डे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात १,३८८ ग्रामपंचायती असून, १,९१० महसुली गावे आहेत. त्यापैकी ११६ गावे ही पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्येची आहेत. ती सोडून उर्वरित सर्व गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे सुरू आहे. सुमारे बाराशे गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व गावे मॉडेल व्हिलेज करायची असल्याने त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, मैला-गाळ व्यवस्थापन इत्यादी कामे करणे आवश्यक आहे.
0 7 4 0 6 1
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *