Thursday, July 25, 2024

‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमाद्वारे धान्यसंकलन, सुसंस्कृती फाउंडेशनतर्फे निराधार मुलांना मदत

नाशिक : सुसंस्कृती फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमात १५०० किलो धान्य आणि ६४ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पिंक फार्मसीचे अध्यक्ष विजय दिनानी यांनाही समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.धान्य व निधी संकलन करण्यासाठी ‘द कपूर्स कल, आज और कल’ हा सांगीतिक कार्यक्रम झाला. सुसंस्कृती फाउंडेशनतर्फे ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून अन्यधान्य, किराणा साहित्य तसेच अर्थिक मदत संकलित करून निराधार मुलांच्या संगोपनाचा भार उचलते. यावेळी डी. जे. हसवानी, हरी कुलकर्णी, दीपक वैद्य, राजू बोकरे, संजय सोनी, डॉ.भूषण सुरजूसे, शरद चांडक, अशोक आचार्य, सचिन नाईक, समीर भावे, आदी उपस्थित होते. शशांक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

धान्य अन् रक्कम गरजूंना

नुकत्याच घेण्यात आलेल्या चॅरीटी शो च्या माध्यमातून १५०० किलो धान्य तसेच ६४ हजार रोख रक्कम संकलित झाल्याची माहिती संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक धनंजय जैन यांनी दिली. संकलित केलेले साहित्य ‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांचा सांभाळ तसेच कर्जबाजारी, शेतीमध्ये झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या सांभाळ करणाऱ्या स्नेहवन या संस्थांना मदत दिली जाते.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang