खामगाव : बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार तथा नवनियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे १३ जून रोजी खामगांव शहरात प्रथम आगमन प्रसंगी जलंब नाका येथे मॉ आत्मशक्ती व्यायाम व क्रिडा प्रसारक मंडळ तर्फे फटाक्यांची आतिषबाजी करुन हार घालून व बुके देऊन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर हे उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खामगांव विधानसभा मतदार संघातून खा. प्रतापराव जाधव यांना प्रचंड मताधिक्याची बढती दिली.त्यामुळे गुरुवारी खामगांव शहरात प्रथम आगमन प्रसंगी जलंब नाका येथे खा. प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबददत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्याची प्रचंड आतिषबाजी करुन आत्मशक्ती मंडळाचे अरुण चव्हाण, जितेंद्र कुयरे, संदीप राजपूत, श्रीकांत ऊर्फ पिंटू टाले, पानझाडे, लल्लेन्द्र काबुकडे, मुन्नाभाऊ कोहार, श्रीकांत देशपांडे, विजय चव्हाण, राहुल चव्हाण, संकेत चव्हाण, महेश देशमुख, गणेश पानझाडे, संजय कस्तुरे, प्रशांत नायसे, पंकज रायने, रवि चांदुरकर, दिनकर जाधव, प्रेमसिंग ठाकूर, निरज मिश्रा, गजानन बोंबटकार, अनिल बळवंत कुळकर्णी, अग्रवालजी यांनी मा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना पुष्पहार व बुके देऊन सत्कार केला. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आ. अॅड. आकाशदादा फुंडकर हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रचंड आतिषबाजी करुन ‘भाजप शिवसेना युतीचा विजय असो’ ‘खासदार प्रतापराव जाधव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ ‘एकच वादा आकाश दादा’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी मोठ्या संख्येत
Users Today : 61