घरफोडीचे सत्र सुरूच.तीन घरफोड्यांमध्ये नऊ लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

Khozmaster
2 Min Read

नाशिक  – शहर परिसरात तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे नऊ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील सिध्दटेकनगर भागात घडली. याबाबत राम किसन काळदाते (रा.सप्तशृंगी अपा.शिवनेरी कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. काळदाते कुटूंबिय ८ ते ११ जून दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे सेफ्टी डोअर आणि लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ३ लाख ८० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ७९ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.

दुस-या घटनेत ध्रुवनगर येथील मोतीवाला कॉलेज भागात चोरट्यांनी मंगळवारी रात्री दोन घरे फोडले. याबाबत वैलनकेनी जॉन फर्नांडीस (रा.शिवांजली रो हाऊस,शिवशक्ती कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. फर्नांडीस व शेजारील ज्ञानेश्वर महाजन यांचे कुटुंबिय मंगळवारी (दि.११) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास एकमेकांना लागून असलेले दोन घरे फोडून सुमारे ४ लाख ७ हजार ४५५ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे मोबाईल आणि पेनड्राईव्हचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक मोतीलाल पाटील करीत आहेत.

0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *