मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसात मराठवाड्यात बीड, लातूर धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी राहणार आहे.
आज परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी राहणार असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी राहणार असून हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
दि १६ व १७ जून- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर व धाराशिव जिल्ह्यात तुरळक वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवला आहे.
Users Today : 1