मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हा कार्यालयाचे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न…

Khozmaster
1 Min Read

दिनांक 14 जून 2024 रोजी बुलढाणा शहरातील एकता नगर मध्ये मराठा सेवा संघ कार्यालयाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मा.श्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते…..!
मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री.रविकांत काळवाघे यांनी बुलढाणा शहरात मराठा सेवा संघाचे एक भवन व्हावे अशी इच्छा आपल्या भाषणामध्ये बोलताना व्यक्त केली…!
यावेळी त्या ठिकाणी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी तात्काळ मराठा सेवा संघाच्या भवनसाठी 1 कोटी व मुलामुलींचे वसतिगृह बांधकामासाठी 3 कोटी रुपयांचा निधी येणाऱ्या काळात उपलब्ध करून सुसज्ज व सर्व सोईयुक्त भवन व वसतिगृह बांधून देऊ असा शब्द यावेळी उपस्थित मराठा सेवा संघाच्या परिवारातील सदस्यांना दिला व मार्गदर्शन केले….!
यावेळी त्याठिकाणी पत्रकार अजय बिल्लारी,योगेश परसे, विजय राऊत,सेवा संघाचे पदाधिकारी यांच्यासह असंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती….!

0 9 4 7 8 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *