खामगाव, दि. 17 : केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीला भेट देऊन अभिवादन केले. त्यांनी स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुतळ्यास माल्यार्पण केले.
श्रीमती खडसे आज दि.17 जून 2024 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांची समाधी ‘शक्तीस्थळ’ येथे भेट दिली व पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन
खामगाव, दि. 17 : केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सोमवारी, दि. 17 जून रोजी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
श्रींचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या वतीने श्रीमती खडसे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार एकनाथ खडसे, संस्थानचे विश्वस्त हरीहर दादासाहेब पाटील, तसेच सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.