मुद्रांक तुटवडा दुर करून नागरीकांचा त्रास वाचवा – डॉ. सत्येंद्र भुसारी

Khozmaster
2 Min Read

चिखली: दि. 19 जुन 2024
चिखली तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला असुन शाळा, महाविद्यालय प्रवेषाचे दिवस आणि पेरणीच्या दिवसात विद्यार्थी, शंेतकरी, नागरीकांना स्टॅम्पची गरज असतांना तुटवडा निर्माण होणे चुकीचे आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चिखली तहसिल कार्यालय परीसरात स्टॅम्प खरेदीसाठी दररोज गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना दोन दोन -तिन तिन दिवस चकरा माराव्या लागतात, कधीच सकाळी स्टॅम्प मिळत नाही दुपारी तिन वाजेपर्यंत भर उन्हात ताटकळत बसावे लागते.  त्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता स्टॅम्प पेपरचा तुटवडा दुर करून नागरीकांचा त्रास वाचावा यासाठी चिखली तालुका कॉग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या नेतृत्वात पदाधिका-यांसह चिखली तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
चिखली तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की चिखली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला असुन विद्यार्थी व शेतक-यांना नाहक त्रास होत आहे. तालुक्यातील गावोगावच्या शेतक-यांना शेती विषयक कामे, पिक कर्ज आदी कामांना स्टॅम्प आवष्यक असतात. आणि शालेय प्रवेष प्रक्रीयेसाठी जी कागदपत्रे लागतात विविध प्रतिज्ञालेख, उपन्न दाखला, कास्ट सर्टिफिकेट, आदिवास प्रमाणपत्र अषा अनेक कामांसाठी स्टॅम्पची आवष्यकता भासते. तहसिल परीसरातील स्टॅम्प विक्रेत्यांकडे मात्र स्टॅम्प मिळत नाहीत, दिवसभर ताटकळत बसूनही स्टॅम्प मिळत नसल्याने शेतकरी, विद्यार्थी व नागरीक त्रस्त झाले आहेत. चिखली तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी व नागरीकांचा त्रास दुर करण्यासाठी स्टॅम्प पेपरचा तुटवडा दुर करण्यात यावा असे म्हटले आहे.
निवेदन देते वेळी चिखली तालुका कॉग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यासह उपसरपंच बबनराव पानझाडे, राहुल इंगळे, रामेष्वर भुसारी, समाधान आकाळ, विनोद आंभोेरे, राजेंद्र शेळके यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *