राजपुत समाजाच्या वतीने सर्वधर्मीय गुणरत्नांचा राज्यस्तरीय महाराणा प्रताप गौरव पुरस्कार सोहळा

Khozmaster
5 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

हिंदुकुल राष्ट्रपुरुष वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८४ जन्मोत्सव निमित्त ग.दि.माडगुळकर नाट्यगृहात राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक, कला,क्रिडा,उद्योग,पत्रकारिता क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त सर्वधर्मीय नररत्नांना महाराणा प्रताप यांच्या नावाने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
 कार्यक्रमाचे उदघाटक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
    महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करत तन्वी चौहान हिच्या सुमधुर स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
   पाचोरा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.सचिन देवरे यांनी आपल्या व्याख्यानातून महाराणा प्रताप यांच्या जीवनातील प्रमुख घटनांसह अंगावर शहारे आणणारा जीवनपट आपल्या भारदस्त शैलीतून श्रोत्यांपुढे सादर केला.
   याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून व्यासपीठावर पद्मश्री गिरीश प्रभुणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपसिंह हजारी,सहायक आयुक्त सिताराम बहुरे,माजी नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे, दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.प्रताप परदेशी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुणे राजनभाई परदेशी,प.पू. अनिलराजदादा मराठे(महामंत्री अ.भा. महानूभाव समाज),राजपूत समाज महिला शहराध्यक्षा अश्विनी राजपूत,अवधेश कुमार सिंह,राम अवतार सिंह,नारायणसिंह सोनार,विजयसिंह,राजपूत,कैलाससिंह चौहान,हभप जालिंदर लोखंडे,विशाल परदेशी,प्रेमसिंह राठौड,महेंद्र परिहार,किरण परदेशी,अशोकसिंह परदेशी,महेंद्र गिरासे,जितेंद्र पाटील,ईश्वर परमार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये राजपूत समाजाचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस यांनी संस्थेच्या माध्यमातून गेल्या ३५ वर्षात समाजहित व देशहितासाठी केलेल्या अनेक चांगल्या कामांची माहिती दिली तसेच येणा-या काळात देखील राजपूत समाज संघटना समाजहिताची कामे करणार असल्याचे विचार व्यक्त केले.
  पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की महान पराक्रमी,स्वाभिमानी बाणा असलेले महाराणा दुश्मनांना कधीही शरण गेले नाही वेळप्रसंगी अरावली पर्वताच्या घनदाट जंगलात गवताच्या भाकरीचे सेवन व जमिनीवर झोपून तेथील आदिवासी भिल्ल,गोंड,कोरकू,ठाकर अशा जमातीच्या लोकांशी मैत्री करून सशस्त्र फौज उभारणी केली व त्याचा उपयोग शेवटपर्यंत देश धर्म आणी मातृभुमिच्या रक्षणासाठी केला महाराणा प्रतापसिंह स्वाभिमानी देशभक्त क्षत्रिय असल्याने दुश्मनांना कधीही शरण गेले नाहीत त्यावेळी असे राजे जन्मले नसते तर हिंदूस्थानाचा पाकिस्तान कधीच झाला असता,या महान महाराणा प्रतापांच्या विचारांवर चालणारी राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर संघटनेने सर्वधर्मिय नररत्नांचा केलेल्या भव्यदिव्य राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन हे इतरांना प्रेरणादायी आहे असे गाैरवोदगार काढत संघटनेला शाबासकी देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी यांनी सांगितले की मी राजपूत समाजाचे आता पर्यंत हजारो कार्यक्रमांना हजेरी लावली परंतु सर्वधर्मिय नररत्नांचा असा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा जो अभुतपुर्व अकल्पनीय दैदिप्यमान पुरस्कार सोहळा आजतागायत अनुभवला नाही.त्याचप्रमाणे राजपूत संघटनेचे देखील सामाजिक शैक्षणिक धार्मिक तसेच गोरगरिबांची सेवा ही कामे काैतुकास्पद आहेत.राजपूत समाज संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन करून राज्य तसेच देश पातळीवर हिंदुत्व जपत सर्व धर्म समभाव या महाराणा प्रतापांच्या विचारावर चालत वेगळा ठसा उमटविला आहे.
   राज्यस्तरीय गुण गौरव सन्मान सोहळ्यात पि.चि.शहराचे दिवंगत माजी महापौर कै.मधुकर पवळे,कै.जयसिंह राजपूत,कै.प्रतापसिंह परदेशी,कै.सैय्यद अहफाजोद्दीन यांना मरणोत्तर समाजभूषण तर धोंडूसाहेब मोरे(जीवनगौरव),हभप एकनाथ नरवडे आध्यात्मिक वारकरी (समाजभूषण),पौर्णिमा परदेशी (समाजभूषण),विशाल धनवडे (समाजभूषण),वनश्री अरूण पवार(समाजभूषण),अतुल परदेशी पत्रकारिता (समाजभूषण),शिशुपाल तोमर(कामगार भूषण),देवानंद गहिले पत्रकारिता (समाजभूषण),हेमंत चौधरी उद्योगरत्न (समाजभूषण),प्रिया परदेशी आदर्श शिक्षक (समाजभूषण),छाया बैस बॅंकीग( समाजभूषण),मेजर ईश्वर इंगळे शौर्यरत्न(समाजभूषण),शैलेंद्र राजपूत उद्योगरत्न (समाजभूषण),शामसिंह राजपूत(समाजभूषण),डॉ.सुरज चौहान वैद्यकीय सेवा (समाजभूषण),जिवनसिंह राजपूत हिंदू धर्म जनजागृती (समाजभूषण),ॲड अंबिका परदेशी विधीतज्ञ (समाजभूषण),वैशाली जाधव (समाजभूषण),विजय वसवे क्रिडारत्न (समाजभूषण),संदिप शिंदे प्रसिद्ध आर्किटेक्ट (समाजभूषण),राजू भुजबळ ( समाजभूषण) पुरस्काराने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच दहावी बारावी बोर्ड परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्प मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
  जन्मोत्सव निमित्ताने महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवन चरित्रावर आधारित संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते त्यामधील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे फातिमा शेख वकृत्व प्रथम क्रमांक, शौर्य चिलवंत निबंध प्रथम क्रमांक,आंचल सुरवाडे चित्रकला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राजपूत समाज प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी यांच्या शुभहस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
  कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य ॲड श्रीराम परदेशी,राणा अशोक इंगळे,राणा मुकेश राजपूत,गणेशसिंह राजपूत,दिनेश पाटील,रूपेश राजपूत,सागरसिंह बघेल,आषुतोश चंदेल,रविंद्र कच्छवे,मल्हार बायस,चतुर्भुज चव्हाण,रेश्मा चिलवंत,ज्योती परिहार,अच्युत चंदेल,रामेश्वर इंगळे,शुभम इंगळे,कुलदीप दिक्षित,आकाश ठाकूर, गणेश राजपूत सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी मेहनत घेतली तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन चिलवंत आणि सुरेश तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन देहू नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पौर्णिमा विशाल परदेशी यांनी केले.
  सामुहीक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती राजपुत समाज संघटनेचे अध्यक्ष ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी याप्रसंगी दिली.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *