कवठे येमाई प्राथमिक शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन संपन्न – शिक्षक,पालकांची मोठी उपस्थिती
कवठे येमाई दि. २० : (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूरच्या पश्चिम भागातील एक जुनी व मोठी प्राथमिक शाळा म्हणून गणल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे येमाई येथे आज गुरुवार दि.२० रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन संपन्न झाला यावेळी शिक्षक,पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक सखाराम फंड हे होते यावेळी शाळेतील तज्ञ शिक्षिका आशा पवार यांनी पहिलीच्या वर्गात दाखल होत असलेल्या नवीन विद्यार्थ्यांची विविध प्रकारची बौद्धिक परीक्षा घेऊन काही पालकांना ही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष दिनेश पोळ,उपाध्यक्ष डॉ.आरती उचाळे,अर्चना देवकर,शिक्षण तज्ञ संचालक तथा जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे,भाऊसाहेब घोडे,सालकर इतर सदस्य,ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी,सुभाषराव उघडे,सालकर उपस्थित होते यावेळी सर्व नवीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या घेतलेल्या बौद्धिक चाचणी चाचणीत योग्य ती उत्तरे दिल्याने उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.उपस्थितांचे आभार शिक्षिका प्रमिला मेसे यांनी मानले.
Users Today : 22