छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर वैजापूर येथे दिनांक १८/६/२०२४ रोजी श्री. सतिष वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली कि, जिल्हयातील महामार्गावर निर्जनस्थळी ट्रक चालकांना थांबवून त्यांना शस्त्रचा धाक दाखवुन त्यांचे ट्रकमधील डिझेल व रोख रक्कम हे लुटमार करण्याचे तयारीने काही व्यक्ती हे वाहनाने जिल्हयात संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे वैजापुर परिसरात गस्त कामी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला संशयीत वाहनाचा शोध घेवुन आरोपी जेरबंद करणे बावत मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी निर्देश दिले होते.यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयीत वाहनाचा शोध घेत लासुर स्टेशन च्या दिशने येत असतांना त्यांना दुपारी १४:०० वाजेच्या सुमारास तिडी गावाचे अलिकडे महामार्गालगत निर्जनस्थळी रोडच्या कडेला कार क्रमांक एम.एच. ०४ एफ.झेड. ३८९६ ही संशयीत रित्या उभी असुन त्यातील दोन ईसम हे लासुर स्टेशनच्या दिशेने जाणा-या ट्रक चालकांना थांबण्याचा ईशारा करतांना दिसले. यावरुन पथकाला त्यांचेवर संशय बळावल्याने त्यांनी त्याचे वाहन काही अंतरावर उभे करून ट्रक थांबवि-या ईसमाकडे जात असतांना त्यांना संशय आल्याने त्यांनी रोडच्या लगत असलेल्या शेतातुन पळ काढला तर कार मधील ईसमांनी त्यांची कार भरधाव वेगात घेवुन पळुन जावु लागले. यावेळी पथकातील पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून कारला तिडी गावच्या अलिकडे वाहन अडवी लावुन थांबविले व कार मधील ०४ संशयीत व्यक्तींना शिताफिने ताब्यात घेतले तर शेतातून पळणा-या दोघांना सुध्दा पोलीसांनी आडमार्गाने त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले.
यावेळी पोलीसांनी अत्यंत कसोशिने या टोळीतील सर्व ०६ ईसमांना ताव्यात घेवुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असतांना त्यांनी त्यांचे नावे १) यश सुनिल जाधव वय २० वर्षे रा. इशांतनगर, कोपरगाव २) गणेश सोन्यावापु ठुवे वय २२ वर्षे रा. खोपडी ता. कोपरगाव ३) रमजान सांडू शेख वय २३ वर्षे रा.सुराळा ता. वैजापुर ४) हरिदंर मंहतो मांझी महंतो वय २६ वर्षे रा. अखता, सुपी, जि. सितामाडी राज्य. विहार ५) क्षितीज दिनेशराव साळुंके वय १९ वर्षे रा. पुरणगाव फाटा, वैजापुर ६) विजय भाऊसाहेव जगदाळे, वय १९ वर्षे रा. वेलगाव, वैजापुर असे सांगितले.
तसेच त्यांचे ताब्यातील फोक्स व्हॅन्टो कार के. एम.एच. ०४ एफ.झेड. ३८९६ ची झडती घेतली असता कारच्या डिक्कीमध्ये ३५ लिटर क्षमतेच्या ०७ कॅन या डिझेलने भरलेल्या व दोन कॅन या रिकाम्या होत्या. असे एकुण ०७ प्लास्टिक कैन ३५ लिटर क्षमतेच्या मिळुन आल्या तसेच डिक्कीत बाजुला दोरी, चाकु, लोखंडी रॉड, प्लास्टिक पाईप असे साहित्य लपवुन ठेवलेले मिळुन आले.गाडीतील डिझेल बाबत त्यांना विचारपुस करता ते पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांना कसोशिने विचापुस करता त्यांनी सांगितले कि त्यांनी लासलगाव, जि. नाशिक येथे महामार्गाचे वाजुला उभ्या असलेल्या ट्रकमधुन डिझेल चोरी केले आहेत. त्याचे गाडीतील घातक शस्त्र व इतर साहित्यानुसार ते जिल्हयातील महामार्गावर ट्रक चालकांना लुटण्याचे तयारीने आलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांचे ताब्यातून व्हिन्टो कार, १७७ लिटर डिझेट, मोवाईल फोन, लुटमारीचे साहित्य असा एकुण ५,७६,४२५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे वैजापुर येथे कलम ३९९, ४०२ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. पुढील तपास वैजापुर पोलीस करित आहेत.