पुण्यात रंगला प्रसाद खैरे आयोजित बालाजी इव्हेंट आणि एंटरटेनमेंट प्रस्तुत इंडिया फॅशन फेस्ट 2024 चा सोहळा

Khozmaster
3 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पुणे;सौंदर्य स्पर्धा ही एक स्पर्धा आहे जी पारंपारिकपणे स्पर्धकांच्या शारीरिक गुणधर्मांचे मूल्यांकन आणि रँकिंगवर लक्ष केंद्रित करते.
पुणे येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येरवडा या ठिकाणी अभिनेते, मॉडेल, सौन्दर्य चिकत्सक प्रसाद खैरे आयोजित बालाजी इव्हेंट आणि एंटरटेनमेंट प्रस्तुत इंडिया फॅशन फेस्ट 2024 हा सोहळा मोठया थाटामाटात पार पडला.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर लगेचच वीरा डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून गणेश वंदना सादर करून एक प्रसन्नित वातावरण तयार केले. आणि लगेचच इंडिया फॅशन फेस्ट 2024 स्पर्धेला सुरवात झाली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक से बढकर एक बुद्धी आणि सौंदर्याची खाण घेऊन स्पर्धकांनी या कार्यक्रमास आपली हजेरी लावली होती. स्पर्धेच्या सुरुवातीलाच आयोजक प्रसाद खैरे यांनी मुली, महिला काय करू शकतात हेच ते आज सर्वाना दाखवून देण्यासाठी मी हे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिलं आहे.असे सांगून स्पर्धेसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रेक्षकांचे त्यांनी आभार मानले.
स्पर्धेला एक आगळीवेगळी रंगत आणण्यासाठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ख्यातनाम निवेदक महेश सोनी यांनी आपल्या बहारदार दमदार निवेदनातून हास्य कल्लोळ करून प्रेक्षकांच्या मनावर राज्यच केले. या स्पर्धेसाठी सर्व मिस्टर/मिस/मिसेस आणि किड्स या सर्वाना प्रशिक्षण आणि ग्रूमिंग देण्याचे काम बालाजी इव्हेंट चे डायरेक्टर प्रसाद खैरे व त्यांची टीम रोहित पवार, नेहा धवसे, चिराग चौधरी, रसिका दोड्डामणी, अक्षय थापा, शिवानी गुप्ता या सर्वानी केले. सोबतच सामाजिक उपक्रम, मीडिया कव्हरेज हे एम.एच फिल्मचे मालक ए.वी. विश्वकर्मा यानी केले. कार्यक्रमाचे प्रमुख आनंद खुडे,सचिन पोतुलवार आणि व्यवस्थापन तेजस जगदाळे पहात होते.या कार्यक्रमासाठी फॅशन इंडस्ट्रिज आणि फिल्म इंडस्ट्रीजच्या बऱ्याच कलाकारांनी आपली हजेरी लावली होती.
स्तुतीसाठी शब्द अपुरे पडापे असे सर्वांनी सुंदर सादरीकरण केले.आणि मग नक्की विजेता कुणाला घोषित करावे यासाठी परीक्षकांचा मात्र गोंधळ उडाला. त्याचसोबत स्पर्धेच्या निकालासाठी मात्र स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या  ह्रदयाची धडधड मात्र वाढली होती. पण स्पर्धा म्हंटल कि हारजीत तर आलीच आणि म्हणूनच मोठया मुश्किलीने या कार्यक्रमास परीक्षक म्हणून लाभलेले   योगेश पवार ,प्रियांका मिसाळ , पूजा वाघ , आरती बारवसे या परीक्षकांनी आपला निकाल जाहीर केला.
*इंडिया फॅशन फेस्ट 2024निकाल*
“4 ते 8 वयोगटामध्ये
प्रथम विजेती – कार्तिकी बट्टे
फर्स्ट रनर अप -जिविका बरी
सेकंड रनर अप -आराध्या येलडी
9-14 वयोगट
प्रथम विजेती – क्षिति कुलकर्णी
फर्स्ट रनर अप – स्मित ठाकरे
सेकंड रनर अप – प्रश्विता बेहले
मिस (कुमारी) गटामध्ये
प्रथम विजेती -तृप्ती भोसले
फर्स्ट रनर अप – अंजली वाघ
सेकंड रनर अप – रिद्धी तोडकर
मिसेस (महिला)गटामध्ये
प्रथम विजेत्या -स्मृती गवळी
फर्स्ट रनर अप -मंजू कालेल
सेकंड रनर अप -सोनाली शाह
मिस्टर(कुमार)गटामध्ये
प्रथम विजेते -अभिषेक कळंबे
फर्स्ट रनर अप -क्षितिज नन्नावरे
सेकंड रनर अप -स्वप्नील गुडेकर
सर्व विजेत्या स्पर्धेकांना उपस्थित मानवरांच्या हस्ते ” बालाजी इव्हेंट आणि एंटरटेनमेंट प्रस्तुत इंडिया फॅशन फेस्ट 2024″ चा बहुमान म्हणून  मानाचा शिरपेच (क्राऊन), डिजिटल सर्टिफिकेट, ट्रॉफी आणि आकर्षक भेट देऊन  सन्मानित करण्यात आले.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *