फुलंब्री येथे डॉ कल्याण काळे यांचा तालुका प्रमुख दिलीप मचे यांनी केला मोठा जाहीर सत्कार

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
फुलंब्री येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय सर्वांचे आवडते कट्टर कडवट निष्ठावंत महाविकास आघाडीचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्या फुलंब्री तालुका येथे, भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी सोयगाव शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षांचे तालुका प्रमुख दिलीप भाऊ मचे जोगेश्वरी हार्डवेअर चे उद्योग पती म्हणून ओळख असणारे जंरडी येथील सूर्यभान गवळी यांच्या भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.
जय शिवराय जय महाराष्ट्र
खासदार डॉ. कल्याण काळे यांचा फुलंब्रीत जाहीर सत्कार
 जालना लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे नव निर्वाचित
खासदार म्हणून डॉ. कल्याण काळे यांची बहुमतेने निवड झाल्यानंतर प्रथमच जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देतांना त्यानी आभार व्यक्त करतांना सोयगाव सिल्लोडचे विधान सभेचे विशेष आभार मानतो. कारण ते त्यांचे घर होते फुलंब्री तर माझे घरच असल्याने मला शाश्वती होती, असे मत खा. डॉ. कल्याण काळे यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले जालना लोकसभा मतदार संघाचे विजयी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे फुलंब्री शहरात जगी स्वागत सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे, जरंडी येथील सुर्यभान गवळी व सोयगाव चे शिवसैनिक पदाधिकारी यांच्या स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भव्य रॅली काढण्यात आली होती. भव्य नागरी सत्कार यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संपन्न झाला. या वेळी नामदेव पवार, विलास औताडे, राजेंद्र पाथरीकर, संदीप बोरसे, काशिनाथ जाधव वरूण पाथरीकर राजेंद्र ठोंबरे अजगर पटेल मंगला कापरे, लहुजी शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना लोकसभेच्या खासदार पदी डॉ. कल्याण काळे बहुमताने निवडून आल्याबद्दल सोयगाव तालुक्याच्या वतीने सोमवार (१७ जुन) रोजी फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराच्या निमित्ताने येथील महात्मा फुले चौक ते मार्केट कमिटी पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅली दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने डिजेच्या तालावर नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे यांनी बोलताना सांगितले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *