बुलढाणा शहराच्या विविध भागात ०९ कोटी रुपये किमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण रुपये ६० लक्ष…!

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नातून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत आहे..!
आज दिनांक २१ जून २०२४ रोजी बुलढाणा शहरातील विविध भागांमध्ये ०९ कोटी रुपये किमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला..!
या विकास कामांमध्ये प्रामुख्याने —-
बुलढाणा शहरातील धाड रोडवरील जुने क्षय आरोग्यधाम समोरील सरकारी तलावांमध्ये कलर फाउंटन लहान मुलांचे मैदान सौंदर्यीकरण व इतर विकास कामे किंमत ०३ कोटी रुपये…!
बुलढाणा शहरातील विविध भागांमध्ये विद्युतीकरण कामे करणे ०१ कोटी ७५ लक्ष रुपये…!
धर्मवीर आखाडा परिसरामध्ये आर्टिफिशल टर्फ क्रिकेट मैदान किंमत ५० लक्ष रुपये….!
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक- ०८ मधील विविध सभामंडप बांधकाम करणे किंमत ७० लक्ष रुपये..!
खुल्या भूखंडांना तार चेंलिंग व फेंसिंग तसेच सुशोभीकरण करणे रुपये ४८ लक्ष…!
शहरातील विविध भागांमध्ये ओपन जिम बसविणे रुपये १ कोटी १३ लाख रुपये…!
या सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये बुलढाणा शहरांमध्ये संपन्न झाला, यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह बुलढाणा शहरातील सर्व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तसेच प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

0 9 7 2 2 3
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *