हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झालेल्या भ्रष्टाचाराची पाहणी करत असताना किनगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री निकम

Khozmaster
2 Min Read

आज दिनांक 26 जून 2024 मंगळवार रोजी सायंकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झालेल्या भ्रष्टाचाराची पाहणी करत असताना किनगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री निकम व त्यांचे सहकारी यांचे सह श्री सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा.
श्री मनोज कायंदे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस माजी जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेता.
काँग्रेसचे नेते सिद्धार्थ जाधव कबीर शेख सय्यद अली हे होते.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 800 किलोमीटरचा आहे याकरिता 56 हजार लक्ष कोटी रुपये खर्च झाले एका किलोमीटर ला किती खर्च झाला यावरून अंदाज करा व हा महामार्ग पॅरिस मधील रस्त्या पेक्षाही चकाचक व्हायला पाहिजे होता.
परंतु भ्रष्टाचारी वृत्तीने हा महामार्ग जवळपास केलेल्या खर्चात 30% चा भ्रष्टाचार झाला असून त्याचे फळ म्हणजे या रस्त्याची निकृष्ट दर्जाची बांधणी या महामार्गाची पाहणी केली असता पुलावर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या पुलावरील लोखंडी बीम हे बाजूला सरकले आहेत. व सिमेंट उघडल्या गेले. साईडच्या पडद्या पडल्या.
इतकेच नव्हे तर या रस्त्याचे गार्ड एक्सीडेंट मुळे निकामी झालेले आहेत हे निकृष्ट दर्जाचे बांधकाम 800 किलोमीटर पैकी फक्त दहा ते पंधरा किलोमीटर मध्ये आहे.आम्ही ज्या वेळेपासून या रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल कार्यवाहीची मागणी करीत आहे अपघातास कारणीभूत असलेल्यांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी केल्यापासून या महामार्गावर थातूरमातूर डागडूजी करणे सुरू झाले आहे. परंतु ही डागडुजी टिकणार नाही.
मोठमोठे ट्रक या रस्त्यावरून गेल्यावर या रस्त्याला हादरे बसतात व निकृष्ट दर्जाच्या कामातून सिमेंट बाहेर येते आमची मागणी आहे की या रस्त्याच्या कामाची क्वालिटी कंट्रोल द्वारे पाहणी करून तातडीने महामार्गाचीदुरुस्ती करणे आवश्यक आहे. आठ पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण महामार्गाची आम्ही पाहणी करणार व भ्रष्टाचार बाहेर आणणार.

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *