महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

पुणे : रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला व्यवस्थापकासोबत (मॅनेजर) वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला आहे.

याबाबत २६ वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्कपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मुकेश नयनमल कलानी (रा. शहनशाह सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग), ७८ (पाठलाग) आणि ३५१(२) (धमकी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. या कंपनीत पीडिता सिनियर कॉर्पोरेट मॅनेजर या पदावर काम करते. आरोपीने वारंवार संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फिर्यादी या राहत असलेल्या पत्त्यावर भेटवस्तू पाठवल्या. तसेच त्या जीममध्ये जात असताना व तिथून घरी परत जात असताना पाठलाग केला. तसेच ऑफिसच्या कामानिमित्त केबिनमध्ये बोलवून अश्लील स्पर्श करून जवळीक साधून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांना नेहमी संपर्कात राहा व वेळोवेळी भेटत जा, नाहीतर माझ्याकडे असलेले पार्टीचे व तुझ्यासोबतचे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अन्थोनी या करत आहेत.

0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *