रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी

Khozmaster
1 Min Read

रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा पनवेल येथील चिंचवण गावच्या हद्दीत 5 जुलै रोजी पहाटे 4 च्या सुमारास अपघात झाला. यावेळी प्रवासी झोपेत होते. या अपघातात एसटी बसमधील चालकासह 14 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरीहून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या एसटी बसने पनवेल येथील चिंचवण हद्दीत बंद कंटेनरला धडक दिली. हा कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला असल्याने अंधारात एसटीने त्याला धडक दिली असल्याचे प्रवाशांनी सांगितले. या धडकेत एसटीतील 14 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचार सुरू आहेत.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *