रत्नागिरी : येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्ष निहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. शिवाय ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
त्यामुळे या महाविद्यालयाचे कामकाज आता अधिक सुरळीत चालेल.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांच्या स्वाक्षरीने सोमवारी या संदर्भातील शासण निर्णय प्रसिध्द करण्यात आला. या शासन निर्णयात म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे सुरु करण्यात आलेल्या ४३० खाटांच्या रुग्णालयाकरिता गट-अ ते गट-क मधील नियमित ५०९ पदे वर्षनिहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच वाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेकडून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
असंख्य पदे रिक्त असल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाकाजात अनेक अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेत मंत्री उदय सामंत यांनी त्याचा पाठपुरावा सतत सुरू ठेवला होता. आता पद निर्मिती झाल्याने या अडचणी दूर होतील.
Users Today : 27