विराट कोहलीच्या पबवर बेंगळुरू पोलिसांची कारवाई, रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याबद्दल एफआयआर दाखल

Khozmaster
1 Min Read

क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळुरु येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब उघडणाऱ्यांवर कारवाई केली होती. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मालकीचे एक पबही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील एमजी रोडवर एक  पब आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कामकाजाची वेळ संपूनही रात्री उशिरापर्यंत पब सुरू असल्याचा आरोप आहे.

डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पहाटे दीड वाजेपर्यंत चालण्यासाठी सुमारे ३-४ पबवर कारवाई केली. रात्री मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या होत्या.

पब मॅनेजरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पब फक्त पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त काळ पब चालवता येत नाही. एमजी रोडवर स्थित one8 कम्युन पब चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. ६ जुलै रोजी, वन8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब कामकाजाच्या वेळेच्या पलीकडे चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *