वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ९४,९६८ कोटींची तरतूद; विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या Wainganga–Nalganaga River Linking Project साठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात तब्बल ९४ हजार ९६८ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. Devendra Fadnavis यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. या निर्णयाचे Prataprao Jadhav यांनी स्वागत केले आहे.

वैनगंगा नदीचे पाणी नळगंगा प्रकल्पात वळवण्यात येणार असल्याने घाटाखालील परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचन समृद्धी निर्माण होणार आहे. यामुळे पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जलसंजीवनी ठरणार असून जवळपास ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील मोठा भाग हिरवागार होण्याचे चित्र पाहायला मिळेल.

या प्रकल्पाला National Water Development Agency तसेच केंद्र सरकारच्या जलसंधारण, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यासह विविध भागात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

या नदीजोड प्रकल्पामुळे बुलढाणा, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच नद्यांमध्ये येणाऱ्या पुराच्या पाण्याचे नियोजन करून त्याचा उपयोग सिंचनासाठी करण्याचा उद्देश आहे.

या प्रकल्पासाठी ६० टक्के निधी केंद्र सरकारचा, तर ४० टक्के निधी राज्य सरकारचा असणार आहे. या महत्त्वाकांक्षी निर्णयाबद्दल प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि Sunetra Pawar यांचे आभार मानले.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *