मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला

Khozmaster
1 Min Read

त्रपती संभाजीनगर: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी ७.१५ वाजता झाली. सदर भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड ,परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील काही भागात जाणवले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तहसीलदारानी दिलेल्या वृत्तानुसार घारेगाव एकतूनी, फारोळा , पांढरी पिंपळगाव, पिंपरी राजा, आडगाव खुर्द या गावांमध्ये भूकंपाचे सौम्ये धक्के जाणवले तर पैठण तालुक्यांत पाचोड ,विहामांडवा येथे सुद्धा धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदारानी कळविली आहे. सर्व तलाठी व मंडळ अधिकारी गावातून माहिती घेत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *