मध्यरात्रीचा थरार! भुकेला बिबट्या हॉटेल शिरला अन् कुत्रा उचलून पळाला

Khozmaster
1 Min Read

 रत्नागिरी : भुकेला बिबट्या मध्यरात्री एका हॉटेलमध्ये शिरला आणि रिसेप्शनच्या टेबलजवळ बसलेल्या कुत्र्याला उचलून निघून गेला. थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे.

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, ती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रत्नागिरी – कोल्हापूर मार्गावरील साखरपा येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी मध्यरात्री बिबट्या शिरला. सुदैवाने रिसेप्शनच्या टेबलवर कोणीही बसले नव्हते. अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात ते जखमी झाले असते. रिसेप्शनच्या टेबलच्या बाजूला एक कुत्रा झोपला होता. दबक्या पावलाने आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून बिबट्या बाहेर निघून गेला.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे उघड झाली आणि त्याची चर्चा सकाळपासून सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना साखरपा भागात घडल्या आहेत. त्यानंतर एक बिबट्या याच परिसरात मृतावस्थेत सापडला होता. त्यामुळे लोकांवर हल्ला करणारा बिबट्या मेला, असे समजण्यात येत होते. मात्र आता हा नवा बिबट्या दिसल्यामुळे नेमके किती बिबटे या भागात आहेत, असा प्रश्न केला जात आहे.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *