मेहकर १२ शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बछिरे व त्यांचे सहकारी यांच्याकडून आमरण उपोषण सुरू केले होते आज त्यास अंशतः यश मिळाले आहे
शेतकरी राजा यांच्या न्याय हक्क मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी व त्यांचे सहकारी यांनी आमरण उपोषण केले चार दिवसानंतर जेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली तेव्हा शासन व प्रशासन खडबडून जागे झाले जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मध्यस्थीने डॉ. गोपाल बछिरे यांची भेट घेऊन कर्जमाफी, शेतमालास भाव, शेतकऱ्यास बारा तास वीज, या मागण्या आम्ही शासनाकडे पाठवून त्यांचा पाठपुरावा करून पूर्ण करून घेऊ तसेच जिल्ह्यांतर्गत असलेल्या मागण्या
१) पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर देण्यात येईल
२) दुष्काळ, अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई देण्यात येईल
३) मेहकर विधानसभा मतदार क्षेत्रातील जल जीवन मिशन च्या कामाची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्या चौकशीत तुमचा एक प्रतिनिधी घेऊत अशा प्रकारच्या मागण्या मान्य करून उपविभाग प्रमुख रवींद्र जोग यांच्या माध्यमाने जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्या व आज शुक्रवार दिनांक १२ जुलै रोजी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत, यांच्या साक्षीने उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन ऊपोषण सोडविण्यात आले
तहसील कार्यालय समोर चार दिवसापासून उपोषण सुरू होते या उपोषणास शिवसेनेचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपालसिंह बछिरे, व सोबतीला प्रा. गणेश बोचरे, लिंबाजी पांडव, किशोरभाऊ गारोळे, संदीपभाऊ गारोळे, गजानन जाधव सर, जीजाताई राठोड महिला जिल्हाप्रमुख जिजाताई राठोड, तालुकाप्रमुख पार्वतीताई सुटे,नारायण बळी, श्रीकांत नागरे, परमेश्र्वर दहातोंडे, रमेशबापु देशमुख लुकमान कुरेशी, हेमराज शर्मा, साहेबराव हिवाळे, श्यामभाऊ निकम, किसन पाटील, महावीर मोरे, जीवन घायाळ, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, समाधान ठाकरे, शेख चांद शेख अजीम, शिवप्रसाद जोगदंड, लालूभाई मुल्लाजी, इकबाल कुरेशी, अमोल सुटे, गोपाल खोतकर, गणेश पाठे, अंकुश पसरटे, संजीवनी वाघ, पार्वतीबाई सुटे, शालिनीताई मोरे, तानाजी अंभोरे, अजय बछिरे, योगेश कंकाळ, साहेबराव पाटील, फिरोज खान, बाबुभाई पठाण, सुनील कमडे, किसनराव आघाव, प्रसेनजित बछिरे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बसले होते