नागपुरात कार चालविताना जोडप्याचे अश्लील चाळे, गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

नागपूर : गाडी चालवताना प्रेयसीसोबत गाडीत अश्लील कृत्य करणाऱ्या सीए तरुणाविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी धरमपेठ परिसरात घडली.

सूरज राजकुमार सोनी (झिंगाबाई टाकळी, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे.

सूरज सीए असून त्याची मैत्रीण अभियंता आहे. १५ जुलै रोजी सायंकाळी दोघेही सीताबर्डी परिसरात गेले होते. रेस्टॉरंटमध्ये काही वेळ घालवल्यानंतर दोघेही एमएच ३१-एफए-६५०६ क्रमांकाच्या कारने लॉ कॉलेज चौकापासून लक्ष्मीभुवन चौकाच्या दिशेने जात होते.

सूरज गाडी चालवत होता. त्याच्यासोबत त्याची मैत्रीण आक्षेपार्ह अवस्थेत बसली होती. ती चक्क चालकाच्या जागेवर गेली व अश्लिल चाळे करू लागली. तेथून जाणाऱ्या वाहनचालकांची अचानक दोघांवर नजर पडली. त्यांनी सूरजची क्लिपिंग बनवली. ही क्लिपिंग मंगळवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाली.

क्लिपिंगमध्ये कारचा क्रमांक आणि ती वेस्ट हायकोर्ट मार्गावरून जात असल्याचे दिसून येत होते. यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून सूरजच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी कार सूरजकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर सूरजला बोलावण्यात आले.

संबंधित चित्रफीत ही भारतीय संस्कृतीला अशोभनीय असुन त्यामुळे जनमानसात वेगळा संदेश जात असल्याचे दिसुन आल्याची पोलिसांनी भूमिका मांडली. पोलिसांनी सूरजविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २८१, २९३, २९६, १२५ तसेच सहकलम १८४ व मोटार वाहन कायद्याच्या सहकलम ११०, ११२, ११७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *