गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा शहरात दुचाकीवरून गुटखा विक्री करणाऱ्यावर मंठा पोलिसांनी धाड टाकून दुचाकी व गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , मंठा पोलीस पथकाकडून तारीख 16 सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मंठा शहरातील महामार्गावरून दुचाकीवरून अवैद्य गुटखा विक्रीसाठी घेऊन जाताना मंठा पोलिसांनी पकडले आहे. यात एम एच 21 बीआर 4897 या क्रमांकाची दुचाकी व गुटखा , पान मसाला , तंबाखू असा एकुण 50 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल , अप्पर पोलीस अधीक्षक आयुषजी नेपाणी , पोलीस उपविभागीय अधिकारी चौरे व पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती , पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष बनकर , मनोज काळे , संजय चव्हाण , पांडुरंग निंबाळकर सतीश आमटे यांच्या पथकाकडून सदर कार्यवाही करण्यात आली.
प्रकाश शिवाजी बर्कुल राहणार ईडोळी, व आकाश अग्रवाल राहणार वाटुर तालुका परतुर यांच्या विरोधात मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे