सततच्या पाठपुराव्याला अखेर यश,पेनटाकळी प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण संपन्न.!

Khozmaster
1 Min Read
मौजे दुधा-ब्रह्मपुरी ता.मेहकर येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माझ्या व आमदार श्री संजय रायमुलकर यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून मी व श्री संजय रायमुलकर लोकप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी नुकसान भरपाई संदर्भात सतत पाठपुरावा करत होतो अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आले त्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे व महायुती सरकार चे मनापासून आभार मानतो.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 15 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. दुधा, ब्रह्मपुरी, पाचला, रायपूर येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 5 कोटी 40 लाख रुपये वितरीत करण्यात आले.
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांनी लोकोपयोगी निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना, शेतीची वीजबिल माफी, एक रुपयात पिकविमा, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, तीन गॅस सिलेंडर मोफत आदी निर्णय घेतले असल्याचे सांगितले. पेनटाकळी प्रकल्पाच्या कालवा पाझरामुळे नुकसान झाले. ही भरपाई मंजूर करून घेण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार श्री संजय रायमुलकर, उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, कार्यकारी अभियंता अ. भा. चोपडे, खडकपूर्णाचे अधीक्षक अभियंता बा. ज. गाडे, नायब तहसीलदार अजय पिंपरकर,तालुका कृषी अधिकारी किशोर काळे शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *