यावेळी कार्यक्रमा चे उदघाटन मा. आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले .
या स्पर्धेत सुयोग अष्टांग योगशाळा मेहकर येथील योग शाळेचे विध्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. योगाचार्य श्रीकांत पोधाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आराध्य अरुण काळे वय 12 यांनी कांस्य पदक तर सौ. जयश्री श्रीकांत पोधाडे हिने रोप्य पदक मिळवून यश संपादन केले तसेच पुढील राज्यस्तरीय योगासन स्पर्धा यामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांनी याचं श्रेय योगशाळा योग शिक्षक व आई वडील यांना देऊन आपला आनंद साजरा केला. यावेळी जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष उपरवट साहेब, शशिकांत बाबर साहेब,सौ. वैशाली निकम ,तसेच सर्व मान्यवर पंच उपस्थित होते.
बुलडाणा जिल्हा योगासन असोसीएशन आणि महाराष्ट्र योग असोसीएशन तर्फे आयोजित बुलडाणा जिल्हा स्तरीय योगासन स्पर्ध घेण्यात आली
0
9
4
8
9
1
Users Today : 63
Leave a comment