वर्षा चव्हाण जालना येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंंठा/ता.२९ वृत्तसंकलन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर कंटेनरने तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण चिमुकली जागीच ठार वर्ष सचिन चव्हाण जालना येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू एक जण चिंताजनक असल्याची नातेवाईकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे वर्षा सचिन चव्हाण ह्या गर्भवती होत्या असे नातेवाईकांनी सांगितले आहे
याविषयी सविस्तर वृत्त अशी की शाळेच्या मध्यंतरीच्या सुट्टीनंतर मायरा पठाण वय ६ वर्ष व वर्ष सचिन चव्हाण वय वर्ष ३० वर्ष ही आपल्या मुलीला घरी घेऊन जात असताना टोकवाडी रोड कडून भरगाव वेगाने येणाऱ्या आयशर कंटेनर क्रमांक एम एच २० इ एल २८८२ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला चालत असलेल्या रुपला रामचंद्र राठोड वय वर्ष ६५ वर्षा सचिन चव्हाण वय ३० वर्ष दोघे राहणार वीरगव्हाण व मायरा रफिक पठाण वय ६ वर्ष राहणार मंठा यांना चिरडले यात मायरा रफिक पठाण सहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली.
तर वर्षा सचिन चव्हाण यांची तब्येत चिंताजनक असल्याने जालना येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे व रुपला रामचंद्र राठोड ग्रामीण रुग्णालय मंठा येथे आणले असता तब्येत चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे वर्षा सचिन चव्हाण गर्भवती होत्या असे नातेवाईकांनी सांगितले आहे. व आयशर कंटेनर चालका विरुद्ध दुपारी चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही अपघात स्थळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मंठा येथील देवी रोडवर आज एक भयानक अपघात झाला यात तिघांचा निष्पाप जागीच मृत्यू झाला मृत्यू झालेली महिला ही गरोदर होती असे कळते.
या रोडवर टोकवाडी,टोकवाडी तांडा, पांगरी खुर्द, पांगरी तांडा, विरगव्हाण, विरगव्हाण तांडा,माळकिणी,आभोडा कदम व जिंतुर तालुक्यातील काही गावांतील नागरिक याच रस्त्यावर जाणे येणे करतात तसेच या भागातील मुले मुली तिचं रस्त्यावरून शाळेत ये जा करतात.तसेच या रोडवरती तहसील कार्यालय, पंचायत समिती, कस्तुरबा गांधी विद्यालय, मंठा तालुक्यातील जागृत रेणुका मातेचे मंदिर याच रोडवर आहे , रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय ही याच रोडवर आहे.
आज जो आपघात झालेला आहे तो सर्व काही सांगून जात आहे
विधानसभेचे माननीय आमदार श्री .बबनरावजी लोणीकर व विधान परिषदेचे आमदार राजेश भैय्या राठोड व स्थानिक नगरपंचायतने यात लक्ष घालून अतिक्रमण त्वरित काढावे नसता इथून पुढेही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
कारण 60 फुटाचा रोड आहे तो फक्त 20 फुटच रहदारीसाठी शिल्लक आहे तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विडोळी फाटा या रस्त्यावर दोन्ही बाजुंनी अनेक वाहने रस्त्यावर उभी असतात स्थानिक पोलीस प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा असे जेष्ठ समाज सेवक अशोक नाना वायाळ रा टोकवाडी ता मंठा यांनी महाराष्ट्र वाईब न्युज चे तालुका प्रतिनिधी गजानन माळकर यांच्याशी बोलताना सांगितले.