गोदावरीत बुडालेल्या संतोष तांगतोडेचा मृतदेह सापडला

Khozmaster
2 Min Read

कोपरगाव (जि. अहमदनगर) : विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेलेला कारवाडी-हंडेवाडी येथील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे गुरुवारी गोदावरी नदीत बुडाला होता. त्याचा शोध घेण्याचे काम महसूल प्रशासन व ग्रामस्थ करीत होते.

२६ तासांच्या शोध कार्यानंतर शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. याच दरम्यान, गुरुवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील कारवाडी-हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५), अमोल तांगतोडे (वय ३०), प्रदीप तांगतोडे (वय २८) व नारायण तांगतोडे (वय ५२) हे विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेले होते.

संतोष तांगतोडे हा गोदावरीत उतरला. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष बुडाला. गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत शोध कार्य सुरू राहिले. अंधार पडल्याने ते थांबविले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संतोष तांगतोडेचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.

तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, आरोग्य विभाग व फायर ब्रिगेडचे प्रमुख सुनील आरण, मंडळाधिकारी नानासाहेब जावळे, तलाठी दीपाली विधाते, पोलिस पाटील रामराजे भोसले, पथकामध्ये कालू अप्पा आव्हाड, संजय विधाते, प्रशांत शिंदे, किरण सीनगर, प्रमोद सीनगर, घनशाम कुऱ्हे, आकाश नरोडे, विशाल, कासार, मंगेश औताडे आदींनी शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
चौकट-
शुक्रवारी सकाळीच बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू होते. दुपारी अडीचच्या सुमारास २६ तासानंतर मृतदेह तरंगत आल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी तहसीलदार भोसले यांना कळवताच कोपरगाव नगरपरिषदेच्या रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. बोटीद्वारे संतोषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

0 6 2 3 5 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *