अकोला प्रती – बाळापुर शहरातील रस्त्यावर पावसाळ्यामुळे मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर विशेष म्हणजे श्रिमती धनाबाई विद्यालय,ए.सि.एस महाविद्यालय असुन विद्यार्थ्याना व नागरीकांना ये जा करण्याकरिता तसेच श्रावण सोमवार सुरू झाले असून कावड धारकांना, भाविकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता.
बाळापुर शहरातील मुख्य पुलावर खूप मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे व मोठ्या प्रमाणात चिखल जमा झाला होता या सदर प्रकरणांचा व्हिडिओ अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा बाळापुर शहरातील जागृत नागरिक शुभम पंजाबराव तिडके यांनी सोशल मीडियावर व्हायरल करताच झोपे गेलेले बाळापुर नगरपरिषद प्रशासन जागे झाले व त्यांनी त्वरित जेसीबी व काही मजूर लोकांच्या सहकार्याने रस्त्यावरील मुरूम टाकून पडलेले खड्डे बुजले व जमा झालेला सर्व चिखल काढला. रस्त्यावर डस्ट टाकण्यात आला, शुभम तिकडे यांच्या या तक्रारीमुळे बाळापूर शहरातील समस्या मार्गी लागल्याबद्दल शुभम पंजाबराव तिडके यांचे बाळापूर शहरातील नागरिकांनी कौतुक केले असून शुभम तिडके यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत
Users Today : 11