कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे शिवसेनेचे जेष्ठ नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील याच्यावर अज्ञात तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न झाला. सुदैवाने अचानक रिव्हॉल्वरचे पिस्टल लॉक झाल्याने तो थोडक्यात बचावला.
काल, शुक्रवारी (दि.९) रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली.
अभिजीत पाटील हा कामानिमित्त शहरात तहसीलदार कार्यासमोरील एका मोबाईल दुकानात आला होता. आपल्या सहकारी मित्रांसोबत मोबाईल दुकानात बसलेला असताना एका अज्ञाताने दुकानामध्ये येवून बंदूक बाहेर काढली व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण अचानक पिस्टल लॉक झाल्याने अभिजीत थोडक्यात वाचला. या घटनेनंतर अभिजीत व त्याच्या सहकाऱ्यांनी अज्ञात हल्लेखोराचा पाठलाग केला.
मात्र, मोटरसायकलवरून हल्लेखोर नगरपंचायतच्या दिशेने पसार झाला. या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नाही. या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Users Today : 27