सोयाबीनच्या सुडीला आज्ञात व्यक्तीने आग लावून केले लाखाचे नुकसान मागिल वर्षी हरबरा तुर गंजीला आग व सोयाबीन चोरचा आजपर्यंत शोध सुरू

Khozmaster
2 Min Read

सतीश मवाळ

 

चिखली तालुक्यातील कारखेड 30/9/22 रोजी 12:30 ते 1 च्या मध्यंतरी रात्रीला अज्ञात इसमाने सोयाबीन सुडी आग लावुन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. दि 1/10/22रोजी सकाळी तलाठी यांनी प्रत्यक्षपणे पाहणी केली असता शेतकरी दशरथ सखाराम राऊत यांची गट क्रमांक 61,62 या 4.80 शेतामधली पाहणी केली असता 2.00हेक्टर वरिल सोयाबीनची सुडी जळुन खाक झाली आहे.अंदाजे उत्पन्न 55 क्विंटल अंदाजे किंमत 30000 रूपये सोयाबीनचे नुकसान झाल्याबाबत तलाठी आर पि देशमुख महादेव उमाडे सरपंच कैलास गायकी पोलिस पाटील विजय राऊत गजानन इंगळे एम एस इंगळे कृषी सहायक रमेश राऊत प्रकाश राऊत इ सक्षम पंचनामा करून वरिष्ठांना माहिती सादर केली आहे.

अशा प्रकारच्या विकृत घटनांमध्ये दिवसें दिवस वाढ होत असून मागील एक वर्षात ही तिसरी घटना आहे . रब्बी एक एकर हरबरा तुर बारा एकर दोन्ही राऊत यांचे मागिल वर्षी अज्ञान व्यक्ती सुड्या पेटवून लाखो चे नुकसान केले होते

व केशव काकडे याचा गावालगत असलेल्या गोठ्यातील 22 पोते सोयाबीन चोरून नेले व इत्यादी छोट्या मोठ्या चोर्या होत असुन चोरट्यांचे मनोबल दिवसन दिवस वाढत यंदा ही सोयाबीन गंजी ला आग लावून नुकसान केले आहे.

त्यामुळे गावातील इतर शेतकरी भयभीत होऊन सोयाबीन गंजी घालण्यासाठी घाबरत आहे.शेतकरी दिवस रात्र मेहनत करून पिकांच्या भरवशावर हा सारा संसार चालवत असतो

अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकं एका मिनिटात त्यांची राख रांगोळी करतात आर्थिक नुकसान करत आहे.अशा लोकांचा शोध लागत नाहीत तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही.शेतकर्याची एकच मागणी आहे लवकरात लवकर शोध लावुन अशा मनोवृत्ती च्या लोकांना अळा घालावा अशी मागणी अमडापुर पोलिस अंतर्गत असलेल्या कारखेड येथील शेतकरी वर्गाकडून होत असून पोलिस प्रशासनाला अशा भामट्यांना पकडण्यात यश मिळेल का?असा प्रश्न गावकरी पडत आहे .

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *