सासरच्या छळामुळे तरूणाचे टोकाचे पाऊल; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Khozmaster
2 Min Read

पुणे : सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तेजसची आई शीला तानाजी चाळेकर (वय ४७, रा. नसरापूर, ता.

भोर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बिबवेवाडी भागात पती -पत्नी दोन मुलांसह राहायला होते. ८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेमसंबधातून त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

त्यानंतर पतीच्या आई-वडिलांनी धार्मिक रीतीरिवाजानुसार दोघांचा विवाह केला. विवाहानंतर दोघामध्ये वाद होऊ लागले. कोराेना संसर्ग काळात तरुणाचा व्यवसाय बंद पडला. त्यानंतर तरुणीला घेऊन तिचे आई-वडील माहेरी आले.

चार महिने माहेरी राहिल्यानंतर ती पुन्हा सासरी नांदण्यास आली. त्यानंतर पुन्हा दोघात वाद सुरू झाले. पत्नीने आई-वडिलांना घरी बोलावून घेतले. तेथे त्यांनी गोंधळ घातला.

आई-वडिलांच्या सांगण्यावरुन पत्नीने घटस्फोट, तसेच पोटगीसाठी न्यायालायत दावा दाखल केला. पत्नीच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरुन एका नातेवाईकाने त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांच्या त्रासामुळे तरुणाने आई-वडिलांसह घर बदलले. बिबवेवाडीतील घर सोडून ते इंदिरानगर भागात राहायला गेले. घरी कोणी नसताना तरुणाने ९ ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मृत तरुणाच्या आई आशा चाळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *