तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
भाजपा शहर अध्यक्ष
देऊळगाव मही मोठी बाजारपेठ असल्याने याला 50 खेडे जोडलेली आहे 50 खेड्यातील माता-भगिनी बाजार व इतर कामासाठी येत असतात मोठी वर्दळ या देऊळगाव मही गावात असते तसेच औरंगाबाद मुंबई पुणे शेगाव जालना दवाखाना व इतर कामासाठी लोकांना प्रवास करावा लागतो यामध्ये वय वृद्ध माता भगिनी गरोदर माता लहान मुले शाळेतील मुले या लोकांना बसण्याची सुविधा तर सोडा पण उभे राहण्यासाठी कुठेच जागा नाही आपला जीव धोक्यात ठेवून रोडवरच उभे राहून प्रवास करावा लागतो तसेच बालवाडी पहिला वर्ग तसेच शाळेतील सर्व मुलांना रोडवरून अर्ध्या मधातून चालावे लागते त्यामुळे त्यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे या लोकांची समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष कैलास राऊत यांनी 13 ऑगस्ट रोजी अन्नदान आमरण उपोषण सुरू केले आहे आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे जनतेच्या समस्या घेऊन भाजपाचा कार्यकर्ता जर उपोषण करून त्याच्या समस्या सुटत नसेल तर सर्वसामान्य जनतेचा काय समस्या सुटते असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे… तसेच सात ते आठ वर्षापासून रोज मरण यातना जनतेंना देऊळगाव माहित या समस्यांसाठी सोसाव्या लागतात गेल्या कित्येक वर्षापासून आंदोलने उपोषणे करून सुद्धा समस्या सुटत नाही म्हणून भाजपाचे शहर अध्यक्ष कैलास राऊत यांनी अन्नत्याग आमरण उपोषणास सुरुवात केली आहे..
Users Today : 11