15 आॉगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था देऊळगाव राजा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला डॉ पंकज धोडरकर यांच्या समर्थ हाॅस्पिटल व गणराज मेडिकल सातेफळ रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते समाज सेवेचे भान ठेवत 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन डॉ पंकज धोंडरकर, डॉ अजय घुगे, मनसे शहर अध्यक्ष बंडू राजे डोळस,शहर उपाध्यक्ष नवनाथ रामाणे , नितेश राठोड यांनी केले होते . यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे बूलढाणा जिल्हा अध्यक्ष शिवादादा पुरंदरे, जिल्हा उपाध्यक्ष आतिश राजे जाधव, शहर सचिव अशोक खरात,शहर सरचिटणीस सचिन खरात, विद्यार्थी शहर अध्यक्ष आकाश डोळस,मनसे जेष्ठ नेते शेक शहजाद भाई, विशाल पवार ,संजय खरात, गणेश खरात,शरद खपके,ओम मेहत्रे,आकाश लोंढे, दत्ता हिवाळे, बालाजी खांडेभराड,योगेश पुंगळे, अमोल पुंगळे,तसेच जालणा ब्लड बँक चे डाॅक्टर कर्मचारी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न झाले़
Users Today : 11