७८ वर्षीय ज्येष्ठाने शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे फोटो काढले; पु. ल. देशपांडे उद्यानातील संतापजनक प्रकार

Khozmaster
1 Min Read

पुणे : सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात फिरायला आलेल्या महिलेचे शौचालयात मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न केला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ७८ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विकास चंद्रकांत पवार (रा. जनता वसाहत, सिंहगड रोड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेसह पु. ल. देशपांडे उद्यानात फिरायला येत असतात. नेहमीप्रमाणे शनिवारी (दि. १७) सायंकाळी त्या उद्यानात गेल्या होत्या. वॉशरूमसाठी त्या उद्यानातील शौचालयात गेल्या. त्यावेळी विकास पवार याने शौचालयाच्या खिडकीतून डोकावून मोबाइलमध्ये फोटो काढले. हे लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर तो पळून गेला. पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील या करीत आहेत.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *