धक्कादायक! आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार, ५० वर्षीय आराेपीस अटक; कामठी शहरातील घटना

Khozmaster
1 Min Read

कामठी : बदलापूर येथील शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवर कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यभर असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील खलासी लाइन येथे एका आठ वर्षीय बालिकेवर शेजारी राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२०) ८ वाजताच्या सुमारास घडली.

 

याप्रकरणी आदेश धनीराम वासनिक (५०, रा. खलासी लाइन, कामठी) याला अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारी रात्री घरी कुणीही नसल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय बालिकेस खाऊ विकत घेऊन देण्याची बतावणी करीत तिला बाेलावले आणि घरात नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिला चाकू दाखवून हा प्रकार कुणास सांगू नकाे. नाही तर तुला मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली.

ती रडतरडत घरी गेली आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला साेबत घेऊन पाेलिस ठाणे गाठले व तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४, ७५, ३५१ (३), पाेक्साे कलम ८, १२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी आदेश वासनिक यास अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मीना झाडे करीत आहेत.

0 9 3 8 5 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *