ज्वारीची शासन खरेदी; १० कोटींचे पेमेंट केव्हा?

Khozmaster
2 Min Read

अमरावती : शासन आधारभूत किमतीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ८३,५५१ क्विंटल उन्हाळी ज्वारीची खरेदी करण्यात आली. यामध्ये खरेदी केलेल्या ज्वारीचे ९.८० कोटींचे चुकारे अद्याप शासनाने दिलेले नाहीत.

त्यामुळे आर्थिक अडचणीतील प्रतीक्षेत आहेत.

किमान आधारभूत खरेदी योजनेत जिल्ह्यात उन्हाळी ज्वारीची खरेदी नऊ तालुक्यातील खरेदी-विक्री संघामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला. शासनानेही ३,१८० रुपये क्विंटल असा हमीभाव दिलेला आहे. त्यातुलनेत खासगीमध्ये २००० ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची धाव शासन खरेदी केंद्रांकडे आहे. विशेष म्हणजे, शासनानेही जिल्ह्याचे लक्ष्यांक दोन वेळा वाढवून दिले व खरेदीसाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे.

जिल्ह्यात २७ जूनपर्यंत ३,६९२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यातुलनेत २६ ऑगस्टपर्यंत २,४४७ शेतकऱ्यांची ८३,५५१ क्विंटल ज्वारी खरेदी केली गेली. शासनाने वाढीव ६१ हजार क्विंटलचे टार्गेट दिल्याने जिल्ह्यात १.६१ लाख क्विंटल ज्वारीची खरेदी शासनमान्य दराने होणार आहे

ज्वारी खरेदीची जिल्हास्थिती
आतापर्यंत झालेली खरेदी: ८३,५५१
क्विंटल हमीभावाने होणारी रक्कम २६,५६,९५१०५ रु.
शासनाकडून प्राप्त रक्कम : १६,७६,३३,२२३ रु.
वाटप केलेली रक्कम : १६,६२,७३,५८३ रु.
शासनाकडून अप्राप्त रक्कम: ९,८०,६१,८८२ रु.

ज्वारीची तालुकानिहाय खरेदी
जिल्हा विपणन अधिकारी यांच्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात २,१६१ क्विंटल, अचलपूर २७,१८२ क्विंटल, दर्यापूर ७,७६८ क्विंटल, नांदगाव २,४०६ क्विंटल, मोर्शी १०,२९५ क्विंटल, अंजनगाव सुर्जी १४,९१५ क्विंटल, चांदूरबाजार ११,८७६ क्विंटल, तिवसा ४,०३१ क्विंटल व चांदूर रेल्वे तालुक्यात २,९१४ क्विंटल ज्वारीची खरेदी केली गेली.

“मुदतवाढीनंतर ३१ ऑगस्टपर्यंत ज्वारीची खरेदी होणार आहे. बारदानाही उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे शासनाकडून लवकरच प्राप्त होणार आहेत.”

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *