कसारा: मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे गावा जवळ एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमधे लिकेज झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. सध्या त्या परिस्थितीवर अग्निशमन दलाने नियंत्रण ठेवले असले तरी पुढील आपत्ती टाळण्यासाठी प्रशासन अलर्ट आहे.
भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे येथे ही घटना घडली. एलपीजी गॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्याने तो वाहून नेणाऱ्या टँकरमधील लिकेज ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आसपासच्या विभागात प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. काही दुर्घटना होऊ नये म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. परिणामी महामार्गावरील वाहतूकही सध्या दुसऱ्या लेनवरून वळवण्यात आली आहे.
Users Today : 22