खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गरोदर, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार

Khozmaster
1 Min Read

त्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर सरकारी शाळेतील शिपायाने बलात्कार केला आणि त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शाळेतील शिपाई आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्याच्या साथीदाराने घटनेच्या वेळी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “१३ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगी रात्री शौचास गेली होती, तेव्हा गावातील पंकज आणि अमित यांनी तिला पकडलं. मुलीला एका घरात नेलं, जिथे अमितने तिच्यावर बलात्कार केला, तर पंकज बाहेर उभा राहून नजर ठेवत होता.”

“आरोपीने मुलीच्या तोंडात कापड भरून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला धमकी देण्यात आली की, तिने तक्रार केल्यास तिला जीवे मारलं जाईल, पण जेव्हा मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली तेव्हा तिच्या आईला याप्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर आईने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.”

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पंकज हा सरकारी शाळेत शिपाई आहे. कायमगंज कोतवालीचे अधिकारी राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी लवकरच अटक करण्यात येईल.

0 9 5 0 0 2
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *