*अल्पवयीन मुलीच्या आधार कार्ड मध्ये फेरबदल करून होतो लाखो रुपयांचा अपहार…
जाफराबाद.दि.३१.(विजय खरात) प्राची राजेश राठोड जन्म दिनांक २८/१२/२०१४ वय वर्षे आदांजे ९ वर्ष असताना ११/०७/२००१ प्रमाणे २३ करून सदरिल मुलीच्या नावे लाडकी बहीण योजनेमध्ये संकेत जाधव नावाच्या व्यक्तीने दुसऱ्या या व्यक्तीच्या नावाची युजर आयडी वापरून सदरील व्यक्तीने बाल वयातील शाळकरी मुलींचे आधार कार्ड घेऊ जन्म तारीखा मध्ये फेरबदल करून स्वतःचा बँक खाते क्रमांक टाकून लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज दाखल करून स्वतःचा खाते क्रमांक,मोबाईल क्रमांक टाकून अर्ज सबमिट आहे आणि असे तब्बल एक दोन नव्हे तर साधारण ३० ते ३५ कमी जास्त वयाच्या लाभार्थी अर्जदारांचे अर्ज सबमिट करून त्या अर्जाला स्वतःचे खाते क्रमांकाच्या आधारे एॅप्रोल/मान्यता मिळवून लाडकी बाहिन योजनेत भ्रष्टाचार करून त्या कमी वयातील शाळकरी मुलीच्या आधार कार्ड नंबर चा गैरवापर करून अपहार केल्याचे निदर्शनास येत आहे.
सदरील लाडक्या बहिणी योजनेमध्ये हेराफेरी करून लॉगिन करणाऱ्या सदरील व्यक्तीला एॅप्रोल मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदार अधिकाऱ्यावर सरकारचा वचक नसल्याचे किंवा सरकारची देखरेख नसल्याचे दिसून येत असून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी योजनेमध्ये कोण कोणाचे हात गुंतलेले आहेत याचा सरकारने उच्च पातळीवर शोध घेऊन अशा सरकारला चुना लावणाऱ्या वर योग्य ते शासन करता येईल का या दृष्टीने चौकशी करावी अशी मागणी लाभापासून वंचित असलेल्या तमाम लाभार्थी महिला तसेच टॅक्स पेअर जनतेकडून सरकारला करण्यात येत आहे.