सिद्धार्थ महाविद्यालयांमध्ये महिलांच्या आरोग्य विषयी जागरुकता कार्यशाळेचे आयोजन*
जाफराबाद.दि.४ (विजय खरात) दि.०३ सप्टेंबर,२०२४ रोजी सिद्धार्थ महाविद्यालय,जाफ्राबाद येथे महिलांचे आरोग्याविषयी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.र.तू.देशमुख हे होते तर मार्गदर्शक म्हणून आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या जाफ्राबाद तालुका समन्वयक श्रीमती.प्रणिता जाधव या उपस्थित होत्या. तसेच वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे,प्रा.अनिल वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती.प्रणिता जाधव ह्यांनी “जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जग उद्धारी’ अशा समाजातील महत्त्वपुर्ण घटक महिला सशक्त असण्यावर आपल्या मार्गदर्शनातून ओहा -पोह केला. किशोरवयीन मुलींना तसेच महिलांना आरोग्यविषयक समस्यावर प्रात्यक्षिकांद्वारे उपाययोजना सुचविल्या. या कार्यशाळेत मासिक पाळी,पीसोओडी,पीसीओएस,वंध्यत्व सारख्या तक्रारी तसेच अॅनिमिया आणि कॅल्शियमचा अभाव आणि यांचे दुष्परिणामांची सखोल माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.र.तू. देशमुख यांनी आपल्या प्रेरक शब्दातून अध्यक्षीय समारोपप्रसंगी आरोग्य जपण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न विद्यार्थ्यांनीनी कशाप्रकारे करण्यात यावे,याविषयी मार्गदर्शन केले.संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. आज आपल्या देशातील महिलांचे आरोग्य ही चिंतेची आणि चिंतनाची बाब बनली आहे. या महिलांचा विकास लहानपणापासूनच व्हायला हवा. तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक आहे,असे मत प्राचार्य यांनी सर्वांसमोर मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.सारिका जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.सरिता मणियार यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.सुनंदा सोनुने,प्रा.मनिषा मोहिते,प्रा.निर्मला खांडेभराड यांनी परिश्रम घेतले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी,प्राध् यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.