अनुराधा मिशन चिखली आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे‘ यांच्या जयंतीनिमित्त आज हिंदू सूर्य महाराणा प्रताप इंडोअर स्टेडियम, अनुराधा नगर, चिखली येथे दिव्यांग सेवा महायज्ञ, मोफत कृत्रिम हात व पाय शिबिर (आर्टिफिशियल लिंब कॅम्प) आयोजित करण्यात आला.
दरवर्षी अनुराधा मिशनच्या वतीने अनेक लोकोपयोगी रुग्णसेवा महायज्ञ, नेत्रशस्त्रक्रिया तथा तपासणी शिबीर अशा विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या शिबिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फायबरपासून निर्मित अत्यंत हलके व मजबूत कृत्रिम हात व पाय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज शिबिरात हात आणि पायांची मापे घेण्यात आली, आणि 30 ते 35 दिवसांनंतर तयार अवयवांचे वितरण केले जाईल. हे कृत्रिम अवयव लावल्यानंतर संबंधित व्यक्ती चालू शकते, सायकल चालवू शकते, टेकडी चढू शकते, आणि सर्व दैनंदिन कामे करू शकते.
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी सुरू केलेल्या या दिव्यांग सेवा महायज्ञाला गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे हा आमचा आजन्म प्रयत्न राहील.
+2
All reactions:
Shivraj Patil and 45 others