पातुर : शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने थैमान घातले असून दोन तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मोरणा निर्गुणा विश्वामित्र यासह पातूर शहरातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला पूर आला आहे या पुरा मुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कते चा इशारा दिला आहे बोर्डी नदीला आलेल्या पुरामुळे पातुर शहरापासून मुजावर पुरा भागाचा संपर्क तुटला होता मुजावरपुरा भागातील अनेक घरांमध्ये बोर्डी नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे पातूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये नदी व नाल्यांचे आणि शिरल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी तूर यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे बोर्डी नदीला आलेल्या पुरांमध्ये शहरांमधून मुजावर पुरा भागाचा जवळपास दोन ते तीन तास संपर्क तुटला होता नदीकाठच्या लोकांमध्ये राहणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे नगरपरिषद नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनाने या भागांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना नदीकाठच्या सुरक्षित स्थळी हलवले आहे बोर्डी नदीला आलेल्या पुरा मुळे शेतात अनेक क्षेत्रांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले दरम्यान अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पातुर शहराला भेट देऊन मुजावर पुरा भागातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यासोबतच बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख तहसीलदार राहुल वानखेडे यांनी सुद्धा पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे दरम्यान आतुर तालुक्यामधील मोरणा निर्गुणा विश्वामित्र उतावळी व बोर्डी या नद्या दुधडी भरून वाहत आहेत पातूर तालुक्यातील तलाव मोरणा धरण त्यासोबतच चोंडी प्रकल्प 100% भरला असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकल्पातून विसर्ग बाहेर पडत आहे यामुळे शहरात ग्रामीण भागातील नदीकाठच्या लोकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान गावाला जोडणारा पुलावर चार ते पाच फुटाचे ओव्हरफ्लो असल्याने काही काळ या भागाचा संपर्क तुटला होता तर बोडखा चिचखेड या गावांचा सुद्धा काही काळ संपर्क तुटला होता दरम्यान दुपारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने नदी नाल्यांना आलेले पूर ओसरताना दिसून आले दरम्यान येत्या 24 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.