सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव येथे त्रिवेणी समूहाच्या वतीने “श्रावण सरी” 2024 या उपक्रमाचे रविवारी मायादेवी नगर रोटरी हॉल जळगाव येथे करण्यात आले होते. या उपक्रमात महिलांनी मराठी गीतांवर आधारित नाच ,गाणी सादर केले कुठलीही स्पर्धा नसल्याने महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. यापूर्वी ही मागील वर्षी श्रावण सरी आणि हळदी कुंकू या उपक्रमाला महिलांचा भरघोसप्रतिसाद मिळाला. आगामी काळात असेच वैविध्यपूर्ण उपक्रम घेण्याचा त्रिवेणी समूहाचा मानस आहे. या कार्यक्रमांत ३०० महिलांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमात तेवढेच न करता महिलांना आरोग्य विषयक माहिती देखील देण्यात आली यावेळी ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल तर्फे डॉक्टर अतुल भारंबे यांनी कॅन्सर विषयी महिलांना जागृत केले. तसेच सौ हर्षाली ताई चौधरी, सो प्रभावती ताई पाटील ,सौ मनीषा ताई ,पाटील सौ विद्या ताई बेंडाळे या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी देखील महिलांना मोठ्या प्रमाणात लकी ड्रॉ देण्यात आले त्यात सारिका पैठणी कडून पाच पैठणी साड्या, रंगधारा होम कलर अँड डेकोर कडून १० आर्टिफिशियल प्लांट, सुनंदा इमिटेशन ज्वेलरी कडून तीन मोतीहार सेट ,येवले नॅचरल्सकडून 90 धूप पॅकेट तसेच हॉटेल सायली , ग्रीन डी एम के व्ही ए मल्टी सोल्युशन , नमस्कार प्लाय , ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल या सर्वांचे सुरेखा पवार,वैशाली बोंडे, शुभांगी पाटील या त्रिवेणी समूहाकडून मनःपूर्वक धन्यवाद . तसेच या कार्यक्रमांत मीनाक्षी सपकाळे,भारती सपकाळे यांचे सहकार्य लाभले.