गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील टोकवाडी येथे दि.०२ सप्टेंबर रोजी बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मागच्या शनिवारी मध्य रात्रीपासून बेफाम पाऊस सर्वदूर कोसळत होता. रविवार पूर्ण दिवस पाऊस तुडुंब बरसला. पोळा सणावर पावसाचे सावट निर्माण झाले होते. नदी, नाल्यांना पूर आला होता. सोमवार
सायंकाळी चार वाजता पावसाने उघडीप दिली आणि घरीदारी कष्क परंपरेतील पोळा हा सण साजरा झाला. गावातील मारोतीच्या पाराभोवती सजवलेल्या बैलांची फेरी पूर्ण करताना शेतकरी आनंदित होते. शेवटी घरासमोर पुन्हा मग बैलांची विधिवत पूजा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांप्रति कृतज्ञ भाव शेतकरी व्यक्त करताना दिसून येत होते. मानकरी, गावकरी, लहान मुलांची भरगच्च पाराभोवती उपस्थित होती
Users Today : 28