कोल्हापूरच्या शिवसेना – जनसंवाद दौऱ्याच्या अखेरच्या सत्रात मंगळवारी हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळा, शाहुवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे आपल्या शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. येथील जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी भरीव निधीची तरतुदही केली आहे. आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेल्या सर्व विकासकामांबाबत नागरिकांना नियमित स्वरूपात माहिती द्या, अशा सूचना यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना केल्या. महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याच्या ही सूचना यावेळी केल्या. महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवा रोजगार यासाठीच्या योजना, सरकारची विकासकामे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. यासाठी त्यांच्याशी नियमित स्वरूपात संवाद साधून जनसंपर्क वाढवा. जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल, असे आवाहन यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांना केले.
या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 27