विलासराव-पीएन पाटलांच्या मैत्रीचा वारसा पुढच्या पिढीकडे, धीरज देशमुखांचा कोल्हापुरात शब्द

Khozmaster
3 Min Read

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख तसेच कोल्हापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांची मैत्री सर्वश्रुत होती. त्यांच्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात. पी एन पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीत विलासराव करवीर नगरीत जाऊन पाटलांच्या प्रचारात सहभागी होत असत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच करवीर नगरीत युवकाशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील या मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. यावेळी विलासरावांचे सुपुत्र, आमदार धिरज देशमुख यांनी सहभागी होत तरुणांशी संवाद साधला.

आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी करवीर नगरीत जाऊन राहुल पाटील यांच्यासमवेत युवकांशी संवाद कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला. त्यांच्या या सहभागाने विलासराव आणि पी एन पाटील यांच्या मैत्रीचा वारसा आमदार धिरज देशमुख आणि राहुल पाटील पुढे नेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कोल्हापूर मधील करवीर मतदारसंघातील काँग्रेस आमदार पी एन पाटील यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. पी एन पाटील यांचा वारसा त्यांचे पुत्र राहुल पाटील जोपासत आहेत.करवीर मतदारसंघात नवमतदार तरुणांशी संवाद या कार्यक्रमात बोतलाना आमदार धिरज देशमुख म्हणाले, विलासरावजी देशमुख आणि पी एन पाटील यांची १९८० पासूनची मैत्री होती. ती मैत्री दोघांनीही शेवटपर्यंत कायम ठेवली. राहुल पाटील हे उद्याचे पी एन पाटील आहेत. पी एन पाटील यांच्या कार्याची झलक राहुल पाटील यांच्यात दिसून येते. विलासराव आणि पी एन पाटील यांच्या मैत्रीचा तोच वारसा पुढेदेखील चालू ठेवत राहुल पाटील व राजेश पाटील यांच्यासोबत माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि मी कायम पाटील कुटुंबियांना साथ देत त्यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही धीरज यांनी दिली.राहुल पाटील हे परिवारातील दु:ख बाजूला सारुन जी माणसं पी एन पाटील यांनी जोडली, जपली त्यांच्या सेवेसाठी तत्पर झाले आहेत. करवीर विधानसभा निवडणुकीमध्ये येथील मतदार राहुल पाटील यांच्या उमेदवारीला खंबीर अशी साथ देतील व त्यांना निवडून आणतील असा विश्वास आपणास असल्याचेही धीरज म्हणाले.पी एन पाटील जनसामान्यांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिले. राहुल पाटील यांना सहकार क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. मागील पाच दशक विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांची मैत्री सगळ्यांनी पाहिली आहे. आता यापुढे देखील तोच वारसा जोपासत देशमुख आणि पाटील परिवार तोच स्नेह आणि तोच जिव्हाळा कायम ठेवेल असे आमदार धिरज विलासराव देशमुख यावेळी म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *